अस्तित्व
   

अस्तित्व कुणाचे अविरत माझ्याभोवती दरवळते
हे मलाच केवळ कळते मी कधी एकटा नसतो.

पायात गुंतली गर्भरेशमी नाती
या वाटा दुर्गम आणि निखारे हाती
मज बळ हे कोठून मिळाले मी थकून जेव्हा बसतो.
 
श्वासात गुंजतो प्रणवच्या झंकार
अन कुणी छेडीत प्राणस्वरांची तार
जग क्षणात हे विरघळते मी तुझिया सोबत असतो.
 
हृदयात उमटले तुझेच ग पाऊल
जाणावे स्पंदनी आता तुझी चाहूल
मन अखंड आतून जळते मी जगात आई हसतो.
 
- स्वप्नकाळ्या— एल. के. कुलकर्णी