विरंगुळा

अस्तित्व

अस्तित्व कुणाचे अविरत माझ्याभोवती दरवळते..

सुख असावे फक्त एवढे

सुख असावे फक्त एवढे स्वत्व आपले जपता यावे;..

मुलींची गोष्ट

उद्याच्या सुंदर जगाचं आकाश माझ्या मुलीचं असेल.... ही मुलींची गोष्ट, ..

मुक्तिबोध

कार्यात आत्मीयतेचा भक्तिभाव नसला तर अमाप भौतिक साधने हाती असून देखील शासनासारखी एक अवाढव्य व्यवस्था असफल होते आणि निष्ठेने भारावलेला मूठभर माणसांचा एक समूह तोकड्या साधनांनिशीही त्यापेक्षा सहस्रपट मोठे आव्हान पेलण्यात बरेचसे यश मिळवितो...

शब्द आणि सूर यातील भेद

शब्दाचे सार्थक होण्यासाठी बुद्धीची गरज लागते, तर स्वरांची मोहिनी सर्व सृष्टीवर पडते...

भारताचा आणि स्त्री जीवनाचा आत्मा

भारताचा आत्मा काय, स्त्री जीवनाचा आत्मा काय, याचा अजून अभ्यास करावा...

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..

स्त्री

एका स्त्रीच्या अंगात आले की ते लोण संसर्गजन्य होऊन चहूकडे पसरते. संसारात दाबून ठेवलेले तिचे अस्तित्व असे रूप घेते. एरवी तर ती विरघळून गेलेली असते...

आई

आई असते वृक्षासारखी सारं काही देतच असते आई असते नदीसारखी सतत पुढे जातच असते ..

तुमची मुलें तुमची मुलें नाहीत

तुमची मुलें तुमची मुलें नाहीत ती, जीवनाच्या इच्छेनुसार, त्याची मुलें आहेत. ती तुमच्या द्वारे आली आहेत, तुमच्या पासून नव्हे आणि तुमच्या जवळ जरी ती असली तरी ती तुमची नव्हेत...

जाहला सूर्यास्त राणी

जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे दूरचा तो रानपक्षी ऐल आता येतसे ..

वादळाची दे गती

उसळत्या रक्तात माँ ज्वालामुखीचा दाह दे वादळाची दे गती पण भान ध्येयाचे असूं दे कीर्तीचे आकाश जेंव्हा चंद्रज्योतींनी झळाळे वा धनाची लाट की पायावरी येऊन लोळे हात हा सोडू नको निर्मोहिता मज त्यात दे .....

शोधावी लागते ती फक्त सुरुवात

कधी कधी शेवट कसा होईल ह्याचा विचार करतांना शेवट होऊनही जातो परंतु आपली मात्र सुरुवात देखील झाली नसते. कधी कधी शेवट पर्यंत सुरुवात सापडतच नाही आणि एखादा शेवट मात्र एखादी सुरुवात देवून जातो...

सुखाची तहान

सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण पाण्यात राहूनही माशाची मग भागात नाही तहान स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप वाटी-वाटीने ओतलं तरी कमीच पडते तूप बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ पैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागू नका वेळ..

भोजन मंत्र

वदनी कवल घेता नाम घ्या मातृभूचे सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे कृषिवल - कृषिकर्मी राबती दिनरात श्रमिक श्रम करोनि वस्तू या निर्मितात करुनि स्मरण त्यांचे अन्न सेवा खुशाल उदर भरण आहे चित्त होण्या विशाल..

काव्यानुभूती

गम्मत अशी आहे, की अनुभव, अनुभूती आणि काव्यानुभूती या तीन शब्दांमध्येच गडबड होत आहे. श्रावणाचा उल्लेख असेल, कलत्या छायांचा उल्लेख असेल, निळ्यासावळ्या भुईचा उल्लेख असेल, कवीने केलेले हे सर्व उल्लेख आपण अनुभव या सर्वसाधारण शब्दाने घेतो.ती अनुभू..

आई

आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं ! सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही.जत्रा पांगते पालं उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनाततशीच जाते ठेवून काही जीवाचं जिवालाच कलावं असं देऊन जाते काही..

उन्हा सारखा हर्ष माझा असावा

उन्हा सारखा हर्ष माझा असावा, घरातून बाहेर यावी मुलेनभा सारखा शोक माझा असावा, तृणातून देखील यावी फुले.जळा सारखी तृप्ती माझी असावी, स्त्रियांनी कडेचे भरावे घडेउषे सारखी दीप्ती माझी असावी, फुलावे भविष्यातले केवडे.भुई सारखी प्..

आयुष्याची परिपूर्णता

आयुष्याची परिपूर्णताआज म्हटले, आयुष्य विणायला घेऊ या, जमतंय का ते बघू या.वाटले अगदी सोपं असेल, रंग संगती जमून आली कि आयुष्य ही सुंदर दिसेल.प्रश्न पडला धागे कोण कोणते घ्यायचे? एक दोनच कि सगळेच वापरायचे?मग ठरविले फक्त छान छानच धागे घेऊ, एक दोनच काय? सगळ..

एकच चहा, तो पण कटिंग

एकच चहा, तो पण कटिंग....एकच पिक्चर, तो पण ट्याक्स फ्रीएकच साद, ती पण मनापासूनअजून काय हवे असते मित्राकडून?एकच कटाक्ष, तो पण हळूच...एकच होकार, तो पण लाजूनएकच स्पर्श, तो पण थरथरूनअजून काय हवे असते प्रियेकडून?एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवूनएकच श्रीखंडाची ..

कालनदीच्या पैलावरुनी

कालनदीच्या पैलावरुनीऐलावरती घुटमळली घागरहलली, कलली, डुचमळली पणनिसटून गेली गिळण्या सागर ||कलती घागर कळण्याआधीभरुनि घेतली ओंजळ वेगेओंजळीतल्या जळात गहिराकृष्ण होऊनी सागर रांगे ||रिती करूनी घागर येथेनिघून गेला कृष्ण खेळीयाभयचकीत मी अन् माझ्यासह ओंजळीमध्ये..

हे हिंदुशक्तिसंभूत दीप्तितम तेजा

हे हिंदुशक्तिसंभूत दीप्तितम तेजाहे हिंदु तपस्यापूत ईश्वरी ओजाहे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजाहे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा ||धृ||करि हिंदुराष्ट्र हे तू ते - वंदनाकरि अंतःकरण तुज - अभिनंदनातव चरणि भक्तिच्या चर्वी - चंदनागूढाशी पुरवी त्या न कथू शकतो ..

प्रार्थना

प्रार्थनातू करुणाकर, तूच चराचर व्यापुनी उरला दशांगुळेतू अविनाशी, विघ्नविनाशीतू तेजाची सूर्यकुळे!कृष्ण घनांतुन तुझीच नुपुरेपाऊसकाळी छुमछुमतीमातीमधुनी तुझ्या रुपाचीरोपे हासत अवतरती!तूच जिवाच्या गाभाऱ्यातील निजबोधाची निरांजनेभवतापातून तूच काढिसी त्रिगु..

सती

सतीकाळीज पिळावे कोणी करुणेचा यावा सूरपेटली उभी अविनाशीअंगांगी कर्पूरगौरहे ललाट अपसूक झुकलेझगमगला भूषणभोगजोगवा नवा मागे तो गुणसुंदर कृष्णपरागमनमंयार भलत्यावेळीझेलता सुखाचे झेलेताऱ्यांचे नुपूर विदेहीलोचनी दीप झालेलेवल्कले गळाला देहलावण्य सतीची आग या..

दिवा असाच राहु दे

दिवा असाच राहु देदिवा असाच राहु दे तुला निवांत पाहु देतपःश्रियेत गे तुझ्या मला उदंड न्हाऊ देव्यथा पिकून गे तुझ्या मुखी सुखे विसावल्या कथा बनून कोवळ्या रसावुनी मुसावल्याऋतू सहाहि ढाळिती किती नव्या नव्या कळाजरेत आगळ्या तुझ्या अपूर्व गंधसोहळा!कधी कधी..

मराठी मायबोली

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राष्ट्र भाषा नसे,नसे बाह्य ऐश्वर्य या माऊलीला,यशाची पुढे थोर आशा असे.न मातब्बरी पंचखंडांतरी ती जरी मान्यता पावली इंग्रजी भिकारीण आई जहाली म्हणूनी कुशीचा तिच्या तीस केवी त्यजी.जरी मान्यता आज हिंदीस देई उदेले नवे राष्ट्..

भिऊन पावलं टाकू नका

भिऊन पावलं टाकू नका भिऊन डोळे झाकू नकाभिणाऱ्यालाप्रकाश कोणी बघू देत नाहीत.भिणाऱ्यालाइथे कोणी जगू देत नाहीत.गरुडाहून झेपावणारा प्रत्येकाला प्राण आहे.विश्वास ठेवा तुमच्या पायात न संपणारं त्राण आहे.हे हिंदुशक्तिसंभूत दीप्तितम तेजा हे हिंदु तपस्यापूत ईश्व..

घर असावे घरासारखे

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंतीतिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती ||या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणीसूर जुळावे परस्परांचेनकोत नुसती गाणी ||त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणीअश्रुतूनही प्रीत झरावीनकोच नुसते पाणी ||या घरट्यातुन ..

ऋतु हिरवा

ऋतु हिरवाडोळ्यावरल्या गांधारीच्यासतीत्व पट्ट्या सोडकाया न तुझी गौररुपाचीसर्वांगाला कोड.||१||वटवृक्षांच्या पारंब्यासमध्यानस्थाचे सोंगप्रपंचून घे दुःखे सारीसंसार नसे हे ढोंग ||२||जळी, तळी, विहिरीकाठीपाण्याचे संचित नसतेझर झर झरता झरता गंगा भगीरथ होते |..

लुगडं

लुगडंकशी फुटली कपाशी हसे चांदणं दुपारीवेचतांना वेळ नाही खांड खायला सुपारी!भुतासारखं वेचून शिणले ना नखं बोटं सायंकाळी मोजणार दांडी मारणार नीट!..

आई

आईजात्यावारती दळता दळता सूर भरविले मलामुसळाने तू कांडण केले आणि घडविले मला...मला चढवता घाट सुखाचा कोसळली कैकदाकधी मनाचे खचले गोपुर पण सावरली पुन्हादरी कपारी ठेचाळत तू उंच उचलले मला.....

व्रत

व्रतजगायचे जर असेल तर, मगगळ्यात गाणे हवेरंग पराभूत स्वप्नांनाही देता यावे नवे....रक्त संपल्या हातांनाही वळता याव्या मुठीअभेद्य अंधाराला देखील असतील कोठे फटी....जगणे तितके खोल असावे दुःख जेवढे जुनेओठ दाबुनी हसतील त्यांची फुलतील श्रावण उन्हे.सहवासाल..

कणा

कणालाभो वेदनेला, विश्वत्वाचा खांबमानव्याचा कोंब, वाढो आता!भेटे त्याचे खेटे, आकांताच्या वाटीअंधाराची मिठी सैल व्हावी !डबाबंद दुःख, खुजे हे आकाश नको परितोष, क्षुद्रत्वाचा!देशी तर दे बा, 'सत्य' नारायणा समस्तांचा कणा, ताठ राहो!-प्रमोद अणेराव ..

कुणी फुलवला मोहोर पिसारा

कुणी फुलवला मोहोर पिसारापानगळीच्या वेळीघडी एक पण ऋतु खेळतीसुखदुःखाची खेळी!झाले गेले विसरून सोबतराहण्याचा करू गुन्हाजगण्याचे विस्कटलेले धागेचल जुळवू या पुन्हाजागून घेऊ का सुखाने थोडेउरलेले दिवस चार ?मी पचवितो अपयशतुही गिळावा अहंकार...

राजाशिवछत्रपती

राजाशिवछत्रपतीमहाराज शिवछत्रपती म्हणजे लोकांचे राजे. सर्व थरातील लोकांची मने पेटवून उठविली महाराजांनीच. ज्वालामुखीच्या बळाने सह्याद्रीही खवळून उठला अन् साडेतीनशे वर्षे इथे कोंदलेला कभिन्न अंधार संपला. गुलामगिरी संपली, वर्मावरच्या वेदना संपल्या. संतसज्जन..

आनंदयात्री-रवीन्द्रनाथ

आनंदयात्री-रवीन्द्रनाथ"राष्ट्राचे आणि मानवाचे आदर्श उंचावण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाच्या वज्रदन्डावर आपल्या वाणीचा ध्वज केला, आणि त्याच्यावर आपल्या राष्ट्राची स्वप्ने चितारली आणि त्यांतून विश्वशांतीचे परमचक्र फिरते ठेवले.""अमर आनंदाकडे, अपार आनंदाकडे ..

लेनिनबाबा

लेनिनबाबा ....तुझ्या बद्दल अजिबात वाचलेलं नाहीनाही म्हणायला कॉलेजात ऐकलंय म्हणा थोडं थोडंअन् 'लिहितोय वेडा' म्हणून मला हसू बिसू नकोतुझ्या हसण्याचे दिवस सरलेत केव्हाच.एक बाई तुझा इतिहास तावातावानं शिकवीत होतीलाल चौकात तुझ्या पुतळ्याखाली तरुण पोरं नाचत हो..

अंतरा

अंतरापुढे चालण्याचा तुला रोज चाळाउराशी धरोनी नवी स्पंदनेनवी स्वप्नभूमी, नवे गीत गाणेस्थायीतुनी अंतर लावणे !मला छंद भारी जुन्या खेळण्याचाकशी मी स्मृतींची जपू बाहुलीसदा वेड येथे उन्हे पेलण्याचेतुझा छंद शोधे नवी सावली !तुझ्या चालण्याला कधी अंत नाहीफुटा..

अनुभव- अनुभूती- काव्यानुभूती

अनुभव- अनुभूती- काव्यानुभूतीगम्मत अशी आहे, की अनुभव, अनुभूती आणि काव्यानुभूती या तीन शब्दांमध्येच गडबड होत आहे. श्रावणाचा उल्लेख असेल, कलत्या छायांचा उल्लेख असेल, निळ्यासावळ्या भुईचा उल्लेख असेल, कवीने केलेले हे सर्व उल्लेख आपण अनुभव या सर्वसाधारण शब्दा..

पोखरण- १९९८

तिसरा डोळा आम्ही नुसता किलकिला केला,तर डळमळून गेले अवघे भूमंडळ.सत्तांध गिधाडांनी केवढा थयथयाट..

ज्यांची बाग फुलून आली

ज्यांची बाग फुलून आलीत्यांनी दोन फुले द्यावीत.ज्यांचे सूर जुळून आलेत्यांनी दोन गाणी गावीत.सूर्यकुळाशी ज्यांचे नातेत्यांनी थोडा प्रकाश द्यावा.प्राक्तनाचा अंधार तिथेप्रकाशाचा गांव न्यावा.मन थोडे ओले करूनहिरवे हिरवे उगवून यावेमन थोडे रसाळ करूनआतून मधुर म..

मैत्री

मैत्रीमैत्री सुखाचा संवाद आहेकधी रंगणारा वाद ही आहे.कधी मायेचा स्पर्श हळुवारकधी रागाचा हक्क ही आहे.अबोलपणाचा कधी बहाणाकधी शब्दांचा भडीमार आहे.नमते घेण्याचा कधी नकारकधी समंजस स्वीकार आहे...

सहज फुलू द्यावे फूल..

सहज फुलू द्यावे फूल,सहज दरवळावा वासअधिक काही मिळविण्याचा करू नये अट्टाहाससुवास-पाकळ्या-पराग-देठ, फूल इतकीच देते ग्वाहीअलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही.थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहजखूणसुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यावा उकलूनमुखवटाही असेल, असो... मा..

निवडक कुसुमाग्रज

निवडक कुसुमाग्रजलढाईच्या अंतिम क्षणीसंसाराचा कोष तोडूनसामान्यच असामान्य होतातलढाई जिंकतात,आणि पुन्हा कोषात जाऊनसामान्य होतात.विजयाची मिरवणूकते परस्थपणाने आपल्या घराच्याखिडक्यांतूनच पाहतात.********माणसाच्या माथ्यावर दारिद्र्यासारखाशाप नाही,पृथ्वीच्या प..

धुळीये मारग (गुजराती कविता )

धुळीये मारग (गुजराती कविता )कोणे कीधु गरीब छीये? कोणे कीधु रांक?का भूली जा मन रे भोळा! आपणा जुदा आंक .थोडाक नथी सिक्का पासे, थोडीक नथी नोटएमा ते शु बगडी गयु? एमा ते शु खोट?उपरवाळी बँक बेठी छे आपणी मालम्माल आजनु खाणु आज आपे ने कालनी वात कालधुळ..

लावण्य रेखा

लावण्य रेखादेखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसेगोरटे व सावळे ह्या मोल नाही फारसेतेच डोके देखणे जे कोंडीते साऱ्या नभावोळीती दुःखे जगाची सांडिती चंद्रप्रभादेखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळेआणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळेदेखणे ते हात ज्यांना निर्मितीचे..

'Outdated' झालंय आयुष्य

'Out dated' झालंय आयुष्य स्वप्नही 'download' होत नाहीसंवेदनांना 'virus' लागलाय दु:खं 'send' करता येत नाहीजुने पावसाळे उडून गेलेत 'delete' झालेल्या 'file' सारखे अन घर आता शांत असतं 'range' नसलेया 'mobile' सारखे'hang' झालेय 'PC' सारखी मातीची स्थिती वा..

क्रियासिद्धिः सत्त्वे भवति

क्रियासिद्धिः सत्त्वे भवतिरथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्त तुरगाःनिरालंबो मार्गः चरणविकलः सारथिरपिरविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसःक्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे. 1विजेतव्या लङ्का चरण तरणीयो जलनिधिःविपक्षो पौलत्स्यः रणभुवि सहायाश्च..

उघडं वाघडं मन ...

उघडं वाघडं मन ...उघडं वाघडं मन,त्यांत काही बाही येतंकसं नुसं होऊन ते नासून नासून जातंतापलेलं मन उकळायला लागतंउतू उतू येतं अन् विस्तावातच जळतं.म्हणून मनाला म्हणतो ,नेमक्या अंशावर नेमकं तापावंआणि हळूच आपसूक थंडावूनमुलायम साय साय व्हावं.पण ..

माणसे वाचतांना...

माणसे वाचतांनाचष्मा काढून ठेवावाजुन्या माणसांना भेटतांना नवे व्हावेनवे पान..

मनांत आठवणी गर्दी करतात...

मनांत आठवणी गर्दी करतात...मनांत आठवणी गर्दी करतात तेव्हा हसतमुखानं त्यांना या म्हणावं,उंच ..